Sunday, November 11, 2012

आई...

नाश्ता नाही होतो तोच डब्याची चिंता सुरु करते..
ती आई...

काय करीन ते घेउन जा म्हणताना सगळ आवडीचे करते..
ती

आई...

पदराला हात पुसत सांभाळुन जा म्हणते..
ती आई...

परतीची आतुरतेने वाट बघत असते..
ती आई...

आपण झोपत नाही तोवर जागी असते..
ती आई...

आणि जिच्याशिवाय आपले आयुष्य अपूर्ण..

ती फ़क्त आईच..!

ती फ़क्त आईच..!!!!

1 comment:

  1. आई ह्या शब्दाची महती सध्या सरळ भाषेत व्यक्त केली आहे.
    म्हणून ती मनाला भावली.

    ReplyDelete

Related Posts Plugin for WordPress, Blogger...